नक्षली कमांडर शंकर राव ठार
कांकेर (छत्तीसगड) – येथे १६ एप्रिलला सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात उडालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ झाले आहेत. छोटे बेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माड भागातील जंगलात ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. घायाळ सैनिकांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चकमकीत नक्षलवादी कमांडर शंकर राव ठार झाल्याचे म्हटले जात आहे. येत्या १९ एप्रिलला येथे पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे.