Rajasthan BJP Death Threat : (म्हणे) ‘हिंदूंसाठी उठणारा आवाज बंद केला जाईल !’ – राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्याला मिळाली धमकी !

राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्याला मिळाली शिरच्छेद करण्याची धमकी !

कोटा (राजस्थान) – येथे उद्योगनगरामध्ये रहाणारे भाजपचे कार्यकर्ते मनोज कुमार यांच्या घराच्या दरवाजावर एक कागद चिकटवण्यात आल्याचे आढळून आले. या कागदावर, ‘गुस्ताख-ए-रसूलसाठी (प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यास) एकच शिक्षा आहे, शरिरापासून डोके वेगळे, डोक्यापासून शरीर वेगळे. तुम्ही हिंदूंसाठी खूप आवाज उठवता. आता तुमचा आवाज बंद केला जाईल. आम्ही अल्लाचे सेवक आहोत आणि तुम्हाला सोडणार नाही. आता तुम्हाला राम वाचवतो का, हे पहातो’, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिलीप सैनी यांनी सांगितले की, मनोज यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत. तपासासाठी पथक सिद्ध करण्यात आले आहे.

मनोज यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये अयोध्येत पार पडलेल्या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी येथे झेंडे लावण्यावरून काही लोकांशी वाद निर्माण झाला होता. परिसरात भगवे झेंडे लावत असतांना काही लोकांनी मंदिराजवळ बकरी बांधली. या वेळी काही लोकांसोबत हाणामारी झाली. या वेळी त्यांनी जिवे मारण्याची आणि बाँबने उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. तेव्हाच्या धमकीवरूनच आता ही धमकी देण्यात आल्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असल्याने अशा धमक्या देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !