साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
आगामी काळात ‘सनातन प्रभात’ला अधिक आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या माध्यमातून ‘सनातन प्रभात’च्या कार्याला आणखी गती मिळून सनातन प्रभातचे संस्थापक संपादक नि हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशा सत्त्वगुणी हिंदूंच्या हिंदु राष्ट्र स्थापनेला गती येईल. यासाठी काही आगामी प्रकल्पांसाठी सेवाभावाने साहाय्य करू शकणारे साधक आणि वाचक यांचा सहभाग अपेक्षित आहे !
सेवा आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य !
१. भाषांतर :
अ. हिंदी/इंग्रजी/कन्नड या भाषांतून मराठी भाषेत भाषांतर करणारे
आ. मराठीतून हिंदी/इंग्रजी/कन्नड या भाषांत भाषांतर करणारे
इ. हिंदीतून इंग्रजीत अथवा इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करणारे
२. व्हिडिओ एडिटिंग : साधे, मध्यम अथवा जटिल व्हिडिओजचे एडिटिंग (संकलन) करण्याचा अनुभव प्राप्त असलेले
३. इमेज एडिटिंग : फोटोशॉप/कोरल ड्रॉ/कॅन्वा ॲप यांसारख्या प्रणालींचा उपयोग करून इमेज पोस्ट बनवण्याचा अनुभव असलेले
४. सोशल मिडिया प्रसार : सोशल मिडियाच्या विविध माध्यमांवरून प्रसार करण्याचा अनुभव असणारे, तसेच त्यासाठी मराठी/हिंदी/इंग्रजी/कन्नड या भाषांत कौशल्यपूर्ण पद्धतीने लिखाण करण्याचा अनुभव असणारे
५. व्हिडिओ संहितेचे लिखाण : व्हिडिओच्या विषयानुरूप अभ्यास करून कुशलतेने संहिता लिहिण्याचा अनुभव असणारे. यासाठी त्यांचा राष्ट्र-धर्म यांविषयी चांगला आणि सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.
वरीलपैकी आपणास कोणतीही सेवा करायची इच्छा असेल, तर त्यांनी आपली माहिती लिहून आम्हाला पाठवावी. साधकांनी त्यांची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून ९९७५६ ०९६४८ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी. वाचकही त्यांची माहिती या क्रमांकावर व्हॉट्सॲप करू शकतात. आपल्याला या संदर्भात अभ्यास करून संपर्क करण्यात येईल. माहिती पुढीलप्रमाणे द्यावी :
सारांश, हिंदूंवरील आघातांचा विषय ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून नियमितपणे मांडण्याचा ‘सनातन प्रभात’चा प्रखर प्रयत्न आहे. त्याला सर्वांनी आणखी बळ प्राप्त करून द्यावे, हीच विनंती !