कराड, ७ एप्रिल (वार्ता.) – मद्य प्राशन करून मारहाण करत घराबाहेर काढत असल्याच्या कारणामुळे वडिलांनी मुलाच्या डोक्यात काठीने प्रहार केला. या मारहाणीमध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील रेठरे बुद्रुक या गावात घडली. प्रतापराव गुलाबराव मोहिते हे रेठरे बुद्रुक येथे पत्नी आणि मुलगा शरद यांसह रहात होते. मुलगा शरद मोहिते यांना मद्य प्राशन करण्याचे व्यसन होते. मध्यरात्री शरद यांनी आई-वडिलांना मारहाण करत घराबाहेर काढत असतांना वडिलांनी तेथीलच काठीने शरद यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे बेशुद्ध पडून नंतर त्यांचा मृत्यू झाला. यात प्रतापराव मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावी युवक व्यसनांना बळी पडतात. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – संपादक)