Sonam Wangchuk March : लडाखमधील चीन सीमेवर काढण्यात येणारा मोर्चा रहित

पर्यावरणवादी सोनम वांगचुक

लेह (लडाख) – सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील ७ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आलेला मोर्चा रहित करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राबवणार्‍या संस्थांबरोबर कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोर्चा रहित केल्याचे सांगण्यात आले. चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.

येथे पत्रकार परिषदेत पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी सांगितले की, दक्षिण लडाखमध्ये मोठ्या औद्योगिक कारखान्यांमुळे भूमी गमावणार्‍या शेतकर्‍यांचे दु:ख आणि उत्तर लडाखमध्ये चीनचे आक्रमण याबद्दल देशभरात जनजागृती करण्याचे ध्येय आम्ही आधीच साध्य केले आहे. आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा, तसेच शांततापूर्ण वातावरणाची चिंता आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचा विचार करून आणि कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांशी कोणताही संघर्ष टाळण्यासाठी आम्ही प्रस्तावित मोर्चा स्थगित करत आहोत.