पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी !

  • जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील मजार (मजार म्हणजे मुसलमानाचे थडगे)

  • ‘सुदर्शन मराठी’ वृत्तवाहिनीची मागणी

सौजन्य:सुदर्शन मराठी

पुणे – आपण आजपर्यंत अनेक ठिकाणी बेकायदेशीर मजारी बघितल्या असतील. भूमी जिहादचे जवळपास सगळी उदाहरणे बघितलेली असतील; पण आता चक्क पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बनवलेली ही मजार बघून आश्‍चर्य वाटते !

प्रशासनाच्या दारातच जर अशी बेकायदेशीर बांधकामे होत असतील, तर जनतेने प्रश्‍न विचारायचे कुणाला ? जर ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुरेश चव्हाणके यांच्या ‘सुदर्शन मराठी’ वृत्तवाहिनीने ‘एक्स’ खात्यावर केली आहे. प्रशासन याविषयी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

संपादकीय भूमिका

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? मजार उभारणार्‍यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करा ! हिंदूंनी आतातरी जागरूक आणि संघटित होऊन धर्मांधांचे हे ‘लँड जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे !