राज्यात प्रथमच निवडणुकीच्या कामांत डॉक्टरांना नेमण्यात येणार !

के.ई.एम्. रुग्णालयातील ९०० पैकी ६०० परिचारिकांना निवडणुकीचे काम दिले !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या के.ई.एम्., सायन, नायर, कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयातील ५०० डॉक्टरांना निवडणुकीच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहे. मुंबईच्या इतिहासात प्रथमच डॉक्टरांकडे हे दायित्व सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना रुग्णसेवेच्या जोडीलाच निवडणुकीचेही अतिरिक्त काम करावे लागणार आहे. परिचारिकांपासून ‘डीन’पर्यंत अशा सर्वांनाच यात सहभागी व्हावे लागेल. पालिका रुग्णालयांतील ८० टक्के कर्मचारी यांना हे काम देण्यात येईल. के.ई.एम्. रुग्णालयातील ९०० पैकी ६०० परिचारिकांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे.