मुंबई – येथील महालक्ष्मी मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणार्या दोन महिलांविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धार्मिक ठिकाणाची विटंबना केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नंदिनी बेलेकर आणि पल्लवी पाटील अशी या महिलांची नावे आहेत.
१. नंदिनी बेलेकर या अनेकदा महालक्ष्मी मंदिराच्या आवारात भटक्या कुत्र्यांना मांसाचे तुकडे खायला टाकतात, अशी तक्रार येथील भाविक अनेक दिवसांपासून करत होते. यानंतर ‘मांस खाऊ न घालता इतर पदार्थ खाऊ घालावेत’, असे निर्देश मंदिर समितीने बेलेकर यांना दिले होते; पण बेलेकर यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात शीला शहा यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
२. यानुसार नंदिनी बेलेकर यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, तर पल्लवी पाटील यांच्याविरुद्ध शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिका
|