समर्थ रामदासस्वामींच्या काळातील जर्मन प्रवासी ‘सर थॉमस रो’ यांनी केलेले प्रवासवर्णन

दिल्लीच्या तत्कालीन उपराज्यपालाने (नायब राज्यपालाने) केवळ संशयावरून १०० प्रवासी हिंदूंची मान कापून हत्या करणे आणि त्यांच्या प्रमुख बैराग्याला पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पिंजर्‍यात फेकणे, अशी शिक्षा करणे 

 

‘सर थॉमस रो’ हा जर्मन प्रवासी समर्थ रामदासस्वामींच्या काळातच हिंदुस्थानात होता. वर्ष १६६५ मध्ये तो दिल्लीचे उपराज्यपाल (नायब राज्यपाल) ‘महंमद अली जीन’ यांचा पाहुणा होता. त्याने लिहून ठेवले आहे – ‘मी आणि महंमद अली जीन गप्पा मारत बसलो असतांना एका खबर्‍याने येऊन सांगितले, ‘‘१०० हिंदु प्रवासाला निघाले आहेत आणि त्यांचा म्होरक्या एक बैरागी आहे. आम्हाला हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटते, तर काय करायचे ?’’ महंमद अली जीनने तात्काळ निर्णय दिला, ‘‘त्या हिंदु प्रवाशांना रस्त्यावर झोपवा आणि त्यांच्या माना कापा. त्यांचा जो म्होरक्या आहे, त्याला पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पिंजर्‍यात फेकून द्या.’’ सर थॉमस रो लिहितो – ‘सायंकाळी मी त्या वाड्याच्या (हवेलीच्या) गच्चीवर उभा होतो. तेव्हा मला काय दिसले ? तर रस्त्यावर १०० प्रेते पडलेली होती. त्यांच्या माना धडावेगळ्या होत्या. त्यांच्या बाजूस असलेल्या एका पिंजर्‍यात ८-१० पिसाळलेले कुत्रे होते आणि त्यांनी त्या बैराग्यास फाडून खाल्ले होते.’

(साभार : श्री समर्थ रामदासस्वामींची राष्ट्र-धर्म आणि शिकवण, पृष्ठ क्र. १७)