रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना शिबिरात’ सहभागी झाल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

१७ ते २१.११.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिर’ आयोजित केले होते. या शिबिरात सहभागी झाल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. मंजुषा म्हेत्रे

१. ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून सर्वकाही करून घेत आहेत’, असे मला वाटत होते. 

२. ध्यानमंदिरात असतांना आलेल्या अनुभूती

अ. मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘सर्वत्र गुरुमाऊली आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. मला ध्यानमंदिराच्या भिंतीतून ‘ॐ’कार नाद ऐकू येत होता. मला डोळे बंद केल्यावर ‘ॐ’ दिसत होता.

इ. आरती चालू असतांना मी प.पू. गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘त्यांच्याकडून माझ्याकडे चैतन्य येत आहे’, असे मला जाणवले.

ई. मी बसून नामजप करत होते, तरीही ‘मी गोल फिरत आहे’, असे मला जाणवले.

उ. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.

३. मी शिबिरात असतांना मला शारीरिक त्रास होत होता. मी प.पू. गुरुमाऊलींना प्रार्थना केल्यावर त्वरित माझा सर्व त्रास दूर झाला आणि मला उत्साह वाटू लागला.’

– कु. मंजुषा मुकुंद म्हेत्रे (वय १५ वर्षे), कोरेगाव, सातारा. (१६.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक