पॅरिस (फ्रान्स) – मुसलमानांचा रमझान महिना चालू होताच फ्रान्समधील एका स्मशानभूमीत सुमारे ५८ कबरींवर ‘अल्लाला शरण जा’, ‘फ्रान्स आधीच अल्लाचा आहे’ आणि ‘मुसलमान नसलेल्यांना रमझान मुबारक’ वगैरे लिहिलेले आढळले. या कबरी ख्रिस्त्यांच्या आहेत, असे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येथील महापौर घटनास्थळी पोचले आणि म्हणाले की, अशा छोट्या शहरात हे विचित्र आहे.
अ. ११ मार्च या दिवशी सकाळी पेरिगॉर्ड व्हर्ट, डॉर्डोग्ने येथील क्लेर्मोंट-डी’एक्सेड्युइल स्मशानभूमीतील ५८ थडग्यांवर वरील शब्द लिहिलेले आढळले. ज्या ठिकाणी अशी वाक्य लिहिले आहेत, त्यामध्ये कबर, युद्ध स्मारक, चर्चचा दरवाजा, येशूचा पुतळा आणि कारंजे यांचा समावेश आहे.
आ. याव्यतिरिक्त एका थडग्यावर ‘GWER’ असे लिहिलेले आढळले आहे. अल्जेरियन अरबीमध्ये ‘ग्वर’चा अनुवाद ‘गोरा व्यक्ती, पाश्चात्त्य किंवा मुसलमानेतर’ असा होतो. एवढेच नाही, तर स्मशानभूमीपासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका चर्चला लक्ष्य करून त्याच्या लाकडी दरवाजावर ‘रमझान मुबारक’ असे लिहिले आहे.
संपादकीय भूमिकाफ्रान्समध्ये केवळ ९ टक्के मुसलमान आहेत, तरी ही स्थिती आहे. उद्या ते यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट झाल्यावर फ्रान्स इस्लामी देश झाला, तर आश्चर्य वाटू नये ! |