Pune Kasba Peth : पुणे येथील कसबा पेठेतील ‘दर्ग्यावर कारवाई होणार’, अशा अफवेमुळे ३० हून अधिक धर्मांधांवर गुन्हा नोंद !

अद्याप कुणालाही अटक नाही

वादग्रस्त जागेबाहेरील पोलीस बंदोबस्त

पुणे – कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ असलेल्या हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या बांधकामावर कारवाई केली जाणार आहे, अशी अफवा ८ मार्चच्या रात्री पसरवली गेली. या प्रकरणी शाकीर शेख, मुदस्सर शेख, ताजुद्दीन शेख यांच्यासह ३० हून अधिक धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.

‘दर्ग्यावर कारवाई होणार’, असे संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आले. त्यामुळे दर्गा परिसरामध्ये मुसलमान मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते. परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चुकीची माहिती देऊन मुसलमान समाजाकडून अपराध घडावा या हेतूने चिथावणी देणे, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर दबाव आणणे, विनाअनुमती जमाव गोळा करणे, समाजामध्ये धार्मिक दुरावा निर्माण करणे या विषयाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

  • केवळ गुन्हे नोंद करून हा विषय सोडून न देता याची मुळाशी जाणे आवश्यक आहे !
  • अफवा पसरवणे आणि दंगल घडवून आणून हिंदूंवर आक्रमण करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ओळखून अशा धर्मांधांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !