घाटकोपर येथील बोनान्झा मार्केटमधील आगीत ४० दुकानांची हानी !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – घाटकोपरमधील बोनान्झा मार्केटमध्ये बंद असलेल्या दुकानाला भीषण आग लागली असून यात ४० दुकानांची पुष्कळ हानी झाली. यात १ जण गंभीर घायाळ झाला आहे. रात्री ११.३० वाजता येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने ६ घंट्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.