अनावधानाने चूक घडल्याचा काँग्रेसचा दावा !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथे काँग्रेसच्या सभेमध्ये समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत म्हणतांना चूक केल्यावरून भाजपने काँग्रेसचे थिरूवनंतपूरम् जिल्हाध्यक्ष पालोदे रवि यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
या प्रकरणी काँग्रेस आमदार टी. सिद्दिक यांनी म्हटले की, ही घटना अनावधानाने घडली आहे. ती जाणीवपूर्वक करण्यात आलेली नसल्याने हे प्रकरण उगीच वाढवू नये. वर्ष २०२१ मध्ये बंगाल येथे भाजपवाल्यांकडूनही अशीच घटना घडली होती, असा दावा त्यांनी एका व्हिडिओद्वारे केला.
संपादकीय भूमिकाजर असे अनावधानाने घडले असेल, तर काँग्रेस देशवासियांची क्षमा का मागत नाही ? |