Hydrographic Survey Deal : मालदीव भारतासमवेतच्या जलविज्ञान सर्वेक्षण कराराचे नूतनीकरण करणार नाही !  

राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांची आत्मघातकी घोषणा !

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – भारतीय सैनिकांना देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी भारतासमवेतच्या जलविज्ञान सर्वेक्षणास कराराचे नूतनीकरण करणार नाही, असे घोषित केले आहे. ‘पाण्याखालील तपशील ही आमची मालमत्ता आहे, आमचा वारसा आहे’, असे मुइज्जू या वेळी म्हणाले.

मुइज्जू म्हणाले की, मालदीव या महिन्यात मालदीवच्या जलक्षेत्रावर २४ घंटे देखरेख ठेवणारी यंत्रणा स्थापन करण्यासाठी काम करत आहे. ज्यामुळे मोठे क्षेत्र असूनही त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

संपादकीय भूमिका

विनाश जवळ आल्यावर बुद्धी चुकीचे निर्णय घेते, त्याचे मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू घेत असलेले निर्णय हे एक उत्तम उदाहरण आहे !