Sandeshkhali Row : संदेशखाली प्रकरणी भाजपला धरणे आंदोलन करण्याची कोलकाता उच्च न्यायालयाकडून अनुमती !

पुढील सुनावणीच्या वेळी मुख्य आरोपी शहाजहान शेख याला उपस्थित करण्याचा आदेश !

कोलकाता (बंगाल) – संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपला कोलकाता मैदानात आंदोलन करण्याची अनुमती दिली आहे. २८ आणि २९ फेब्रुवारी या दिवशी हे आंदोलन होत आहे. येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली हे आंदोलन चालू आहे. आंदोलनाच्या वेळी ध्वनीक्षेपक यंत्रणेचा वापर न करण्याचे, तसेच दीडशेपेक्षा अधिक लोक नसावेत, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख हा हिंदु महिलांचा लैंगिक छळ करत असून त्याने हिंदूंची भूमीही बळकावली आहे. या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी भाजपने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तृणमूल काँग्रेस सरकार आंदोलनास अनुमती देत नसल्याचा आरोप भाजपने केला होता. यानंतर भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली.

सौजन्य : डीडी न्यूज 

१. संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची माहिती ४ वर्षांपूर्वी पोलिसांना दिली होती; मात्र त्याविषयी पोलिसांनी कारवाई केली नाही. याविषयी न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केले.

२. लैंगिक छळासह ४२ प्रकरणे आहेत; परंतु आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यासाठी ४ वर्षे लागली. ४ मार्च या दिवशी पुढील सुनावणी होणार असून त्या वेळी सीबीआय, ईडी (अंमलबजावणी संचालनालय), शाहजहान शेख, पोलीस अधीक्षक आणि बंगाल सरकारचे प्रतिनिधी यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

३. न्यायालयाच्या या आदेशावर तृणमूल काँग्रेसकडून आश्‍वासन देण्यात आले आहे की, ७ दिवसांत मुख्य आरोपी शाहजहान शेख याला अटक करू !

संपादकीय भूमिका  

आता आंदोलनापेक्षा बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! त्यामुळे भाजपने हिंदुहित रक्षणासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही केली पाहिजे !