रशिया-युक्रेन यांचे युद्ध चालू होऊन २ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…
गेल्या २ वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जग भोगत आहे. (२४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशिया-युक्रेन युद्ध चालू झाले.) श्रीमंत आणि गरीब देशांच्या आर्थिक विकासाचा दर घटला. तेलाच्या किमती, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी वाढली. या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा एकमेव देश आहे भारत ! जगातील तिसर्या क्रमांकाचा सर्वाधिक तेल आयात करणारा भारत या २ वर्षांत तेलाचा मुख्य निर्यातदार बनला. ३७ अब्ज डॉलरचे (३ लाख ७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) तेल भारताने रशियाकडून आयात केले आणि त्याला रिफाईंड करून युरोप अन् अमेरिका यांना विकले.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक