प्रश्‍नपत्रिका फुटल्याने उत्तरप्रदेश सरकारने रहित केली पोलीस शिपायांची भरती परीक्षा !  

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १७ आणि १८ फेब्रुवारी या दिवशी झालेली पोलीस शिपायांची भरती परीक्षा रहित केली आहे. ही परीक्षा पुढील ६ मासांत पुन्हा घेण्यात येईल, असेही सरकारने सांगितले आहे. या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, युवकांच्या परिश्रमाशी खेळणे आणि परीक्षेच्या सचोटीशी तडजोड करणे हे मान्य करता येणार नाही. अशा बेशिस्त घटकांवर कडक कारवाई होणार हे निश्‍चित.

सौजन्य इंडिया डेलि लाईव 

संपादकीय भूमिका 

भारतात प्रश्‍नपत्रिका फुटणे आता नित्याची घटना झाली आहे. अशा घटना सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद !