श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्री गुरूंची सेवा केल्यावर संकुचित वृत्ती जाऊन व्यापकता येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ


नामाच्याही पुढे केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागतो आणि तेव्हा देवच भक्ताची सेवा करू लागतो

‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ


समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

‘समष्टी सेवेमुळे भगवंताच्या निर्गुण निराकार तत्त्वाशी शीघ्रतेने एकरूप होता येते; कारण समष्टी सेवा करतांना आपल्या इच्छा सोडून इतरांची इच्छापूर्ती होण्यासाठी जगावे लागते. यातून अहं लवकर अल्प होतो. त्यामुळे देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ