श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्राची (देवीची) मानसपूजा करतांना ईश्वरेच्छा अनुभवता येणे

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली (श्री ललिता त्रिपुरासुंदरी देवीची १०८ नावे) म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते. एकदा श्रीयंत्राची मानसपूजा करतांना मला सूक्ष्मातून पारिजातकाचे फूल दिसले. त्यानंतर लगेचच शतनामावलीत पारिजातकाच्या फुलाचा उल्लेख आला. आश्चर्य म्हणजे ‘नामावली म्हणतांना श्रीयंत्राला कोणती फुले अर्पण करायची ?’, हे मी काहीच ठरवले नव्हते. मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’ – (श्रीचित्‌शक्ति) सौ. अंजली मुकुल गाडगीळ (१३.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक