‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भावस्मरण करतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
हे माते, (टीप १)
तुझा सहवास चैतन्यदायी आणि आनंददायी ।
तुझा सहवास तारक आणि मारकही ।। १ ।।
तुझा सहवास शक्ती वर्धन करणारा ।
गतीशील आणि कृतीशील करणारा ।। २ ।।
तुझा सहवास लढायला शिकवणारा ।
आणि सकारात्मकतेचा मूलमंत्र देणारा ।। ३ ।।
जन्मोजन्मीचे आवरण दूर करून उत्साह प्रदान करणारा ।
ईशप्राप्ती होण्यासाठी धडपडायला शिकवणारा ।। ४ ।।
व्यक्त करण्या कृतज्ञता तुज चरणी ।
गुरुदेवांनी (टीप २) शिकवली मज सुंदर शब्दांची भाव गाणी ।। ५ ।।
हे माते, माझ्या मनीचे सर्व विकल्प दूर करून तुझ्या पावन चरणी या शरणागत जिवाला आधार दे !’
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |