Naseema becomes Meenakshi : इस्लाम त्यागून बिहारची नसीमा खातून बनली मीनाक्षी शर्मा !

हिंदु धर्मात प्रवेश करून हिंदु प्रियकरासोबत केला विवाह

बिहारची नसीमा खातून (मीनाक्षी शर्मा) प्रियकर महेश शर्मासोबत

पाटलीपुत्र – बिहारच्या पूर्णिया येथील रहिवासी नसीमा खातून हिने इस्लाम धर्माचा त्याग करून सनातन धर्म स्वीकारला आणि तिचा प्रियकर महेश शर्मासोबत हिंदु पद्धतीनुसार लग्न केले. नसीमा खातून आता मीनाक्षी शर्मा झाली आहे. ‘मोगल आक्रमकांमुळे माझे पूर्वज मुसलमान झाले होते. माझी श्रद्धा सनातन धर्मावर आहे. मी हिंदु देवतांची पूजा करते. इस्लाम धर्मात महिलांना आदर दिला जात नाही. त्यामध्ये तिहेरी तलाकसारख्या वाईट प्रथा प्रचलित आहेत. मी स्वेच्छेने ‘घरी वापसी’ केली आहे’, असे तिने सांगितले.

‘निकाह हलाला’ला विरोध !

नसीमा हिचे आगरा येथील मुसलमानाशी विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे. तिच्या पतीने तिला ६ महिन्यांपूर्वी तलाक दिला होता. यानंतर निकाह हलालासाठी तिच्यावर दबाव आणला जाऊ लागला. तिने त्याला विरोध केला तेव्हा तिला कुटुंबियांनी घराबाहेर काढले. यानंतर ती तिच्या माहेरच्या घरी राहू लागली होती.

‘निकाह हलाला’ ही इस्लाममधील कुप्रथा आहे. पहिल्या पतीने तलाक दिल्यावर परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतात. नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याच्या प्रथेला ‘निकाह हलाला’ म्हणतात.

हिंदु धर्म स्वीकारून विवाह

नसीमा खातून ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून उत्तरप्रदेशातील बरेली येथील रहिवासी महेश शर्मा यांच्या संपर्कात आली. यानंतर हळूहळू दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती बरेली येथील अगस्त्य मुनी आश्रमात पोचली. तेथे तिने वैदिक पद्धतीनुसार सनातन धर्म स्वीकारला. यानंतर मीनाक्षी बनलेल्या नसीमाचा विवाह महेश शर्मासोबत पार पडला.

विवाहानंतर नसीमा हिला धमक्या

विवाह केल्यानंतर नसीमा हिला तिच्या मुसलमान कुटुंबियांकडून धमकावणे चालू झाले आहे. (हिंदूंनी लव्ह जिहादला विरोध केल्यावर त्यांना सर्वधर्मसमभावाचा उपदेश देणारे अशा वेळी कोणत्या बिळात लपून बसतात ? – संपादक) ‘त्यांनी मला आणि माझ्या सासरच्या लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मी बरेलीच्या पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे’, असे तिने सांगितले.