
कोल्हापूर – राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले. राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, या मागणीसाठी ‘शिवशाही फाऊंडेशन’ आणि अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले.
या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, कार्याध्यक्षा सौ. मनीषा घाटगे, युवा महिला संघटक दिशा मांडवकर, गौरी कुलकर्णी, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, श्री. जयराज भाईराणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेलार-पाटील, उपाध्यक्षा श्रीमती शिलाताई माने यांसह अन्य उपस्थित होते.
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित