UP STF Action : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांकडून ४ बाँब जप्त !

जावेद याला अटक

आरोपी जावेद

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या ‘विशेष कृती दला’च्या (एस्. टी.एफ्.च्या) पथकाने मुझफ्फरमधील खालापार परिसरातून ४ टायमर बाँब जप्त केले. ‘टायमर बाँब’मध्ये एक उपकरण बसवण्यात आलेले असते. त्याद्वारे वेळ निश्‍चित करण्यात येतो. त्या वेळेत बाँबचा स्फोट होतो. या प्रकरणी पोलिसांनी जावेद नावाच्या एका मुसलमान तरुणाला कह्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे. मेरठहून बाँब निकामी करणार्‍या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. हे टायमर बाँब मुझफ्फरनगरमध्येच बनवले जात असल्याचे सांगण्यात आले. (मुझफ्फरनगरमध्ये बाँब बनवले जात असून त्याचा थांगपत्ता न लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

(सौजन्य : Republic Bharat)

१. हे बाँब खालापार परिसरात रहाणार्‍या महिलेने मागवल्याची स्वीकृती जावेदने चौकशीच्या वेळी दिली आहे. या महिलेचा शोध घेण्यात पोलीस पथक व्यस्त आहे. (जिहादी आतंकवादी कारवायांमध्ये महिलाही अग्रेसर असल्याचे उदाहरण ! – संपादक)

२. ‘एस्. टी.एफ्.’चे पोलीस अधीक्षक  ब्रिजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी टायमर बाँब बनवला होता. (तर मग पोलिसांनी तेव्हाच त्याचावर कारवाई केली असती, तर आजची वेळी आली नसती ! – संपादक)

३. जावेद याचे आजोबा फटाके बनवण्याचे काम करत होते. त्याला ‘बाँब कसा बनवायचा ?’, हे आजोबांनी शिकवले. यानंतर त्याने ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून अत्याधुनिक बाँब कसे बनवायचे ?’, हे शिकून घेतले.

संपादकीय भूमिका

‘आतंकवादाच्या प्रकरणात नेहमी एका विशिष्ट धर्माच्या लोकांना का अटक केली जाते ?’, याचे उत्तर धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणारे देतील का ?