रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली माहिती
मॉस्को (रशिया) – आम्ही कर्करोगाच्या लसी आणि नवीन पिढीतील ‘इम्युनोमोड्युलेटरी’ औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ आलो आहोत. मला आशा आहे की, लवकरच या औषधांच्या पद्धती वैयक्तिक स्तरावर प्रभावीपणे वापरल्या जातील, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. या लसींविषयीची कोणतीही अधिक माहिती पुतिन यांनी दिलेली नाही. त्यामुळे ही लस नेमकी कधी उपलब्ध होणार ? आणि या लसींमुळे कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळतील ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जगातील अनेक देश गेल्या काही वर्षांपासून कर्करोगावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.