नैना परिक्षेत्रामध्ये ‘यू.डी.सी.पी.आर्.’विषयी राज्यशासन सकारात्मक ! – उद्योगमंत्री उदय सामंत

पनवेल – मागील २ वर्षांपासून पनवेलचे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आतापर्यंत नैनाबाधितांना केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘लवकरच याविषयी बैठक घेऊ’, असे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात बैठक झाली नाही. शेवटी १२ फेब्रुवारी या दिवशी ही बैठक घेण्यात आली. ‘नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रामध्ये (नैना) एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, म्हणजेच यू.डी.सी.पी.आर्. लागू करण्याविषयी शासन सकारात्मक विचार करेल’, असे आश्वासन बेलापूर येथील कोकणभवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले.