जैन आचार्य प.पू. १०८ आचार्यश्री विद्यासागर महाराज ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ पदवीने सन्मानित !

जैन आचार्य प.पू. १०८ आचार्यश्री विद्यासागर महाराज

मुंबई – जैन धर्मातील महान संत शिरोमणी परम पूज्य १०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी आतापर्यंत जैन परंपरेनुसार ५५० पेक्षा अधिक जणांना दिगंबर मुनी दीक्षा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांची ‘जागतिक विश्व कीर्ती रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. आचार्य श्री यांना ‘ब्रह्मांडाचे देवता’ म्हणून ११ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सन्मानित करण्यात आले आहे, तसेच ‘मूक माटी’ या त्यांच्या महाकाव्यास ‘ब्रिटीश नॅशनल युनिव्हर्सिटी क्वीन ऑफ मेरी’ने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डि.लीट) या पदवीने सन्मानित केले आहे. ‘ही अत्यंत अविस्मरणीय, अलौकिक आणि अभिमानास्पद अशी गोष्ट असून ही घटना जैन समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल. अशा महान तपस्वी संत शिरोमणी परम पूज्य १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना कोटी कोटी नमन’, असे जैन समाजाने म्हटले आहे.