अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
मुंबई – अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यापूर्वी मॉरिस नोरोन्हा याने बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण यूट्यूबवरून घेतल्याचे उघड झाले आहे. संबंधित व्हिडिओ पाहून त्याने गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अमरेंद्र मिश्रा १३ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत होता. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
‘यूट्यूब’सारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांचे दुष्परिणाम जाणा ! |