US Citizenship By Indians : गेल्या वर्षी ५९ सहस्रांहून अधिक भारतियांनी स्वीकारले अमेरिकेचे नागरिकत्व !

( प्रातिनिधिक छायाचित्र )

नवी देहली – ‘यूएस् सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’च्या वर्ष २०२३ च्या (३० सप्टेंबर २०२३ या दिवशी संपलेले वर्ष) प्रगती अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये अमेरिकेत ५९ सहस्र  भारतीय नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. अमेरिकेत मेक्सिकोतील नागरिकांनंतर भारतियांनी सर्वाधिक नागरिकत्व घेतले आहे.

( प्रातिनिधिक छायाचित्र )

१. या अहवालानुसार, वर्ष २०२३ च्या आर्थिक वर्षात अनुमाने ८ लाख ७० सहस्र परदेशी नागरिक अमेरिकेचे नागरिक बनले. त्यांपैकी १ लाख १० सहस्रांहून अधिक (१२.७ टक्के)  मेक्सिकोच्या नागरिकांचा, तर ५९ सहस्र १०० (६.७ टक्के) भारतीय नागरिक यांचा समावेश होता.

२. अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तेथे किमान ५ वर्षांसाठी कायदेशीर स्थायी निवासी असणे आवश्यक असते, तर संबंधितांचे पती किंवा पत्नी यांना किमान ३ वर्षे अमेरिकेत रहाणे आवश्यक असते.