अहिल्यानगर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यावर उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील एकल महिलांसाठी काम करणार्या संस्था, तसेच कार्यकर्ते यांसमवेत ८ मे २०२३ मध्ये जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यात अधिकारी आणि संस्था कार्यकर्त्यांची एक समिती नेमून नियमित बैठक घेण्याचे ठरले; मात्र ९ मास झाले तरी पुन्हा एकही बैठक झाली नाही.
याविषयी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणाले, ‘‘एकल महिलांच्या सर्वेक्षणाची कल्पना आणि नियोजन करण्यात जिल्हा परिषदेला वारंवार साहाय्य केले. १ लाख संख्या निघाल्यावर प्रकल्पाची रूपरेषा करून दिली. तो प्रकल्प करण्यासाठी बैठक घेतली. त्यात नियमित बैठक घेऊ, समिती करू, असे ठरले; पण नंतर कोणतेही कारण न देता त्यांनी सामाजिक संस्थांना दूर केले. याविषयी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना एकल महिला संघटना भेटणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना जाब विचारावा, अशी विनंती केली जाईल.’’
जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकार्यांना याविषयी विचारले असता, एकल महिलांच्या प्रश्नांवर काम चालू आहे. त्यांना वेळोवेळी साहाय्यही केले जात आहे. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांविषयी काम होत नसल्याच्या आरोपात तथ्य नाही.
संपादकीय भूमिका
|