मिरज – २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालेले ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज), तसेच श्रीमंत उर्जितसिंगराजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांचा १२ फेब्रुवारीला कागवाड येथील ‘सरकार मल्टिपर्पज हॉल’ येथे सन्मान समारंभ आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी गुरुदेव आश्रमाचे प.पू. यतिश्वरानंद महास्वामीजी हे अध्यक्ष असून ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील, सेनापती कापसी येथील श्रीमंत राणोजीराजे जयसिंगराव-घोरपडे सरकार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर, उत्तर कर्नाटक येथील प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख श्री. व्यंकटेश देशपांडे उपस्थित रहाणार आहेत.
तरी या कार्यक्रमास रामभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन, तसेच कागवाड परिसरातील सर्व श्रीरामभक्त यांनी केले आहे.