नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी काँग्रेसविषयी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडण्यास प्रारंभ केला होता. स्वपक्षाच्याच धोरणांवर काही प्रसंगी त्यांनी टीकाही केली होती. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती. या पार्श्वभूमीवर आचार्य प्रमोद कृष्णम् लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी त्यांच्या हकालपट्टीवरून ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करत म्हटले, ‘राम आणि राष्ट्र यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही.’
राम और “राष्ट्र”
पर “समझौता” नहीं किया जा सकता. @RahulGandhi