हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले त्यागपत्र !

मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीला क्षमा केल्यावरून घेतला निर्णय !

हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षा कॅटालिन नोव्हा

बुडापेस्ट (हंगेरी) – हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षा कॅटालिन नोव्हाक यांनी राष्ट्राच्या सर्वोच्च पदाचे त्यागपत्र दिले आहे. बाल लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तीला क्षमा केल्याच्या निषेधार्थ त्यांनी त्यागपत्र दिले. या वेळी नोव्हाक म्हणाल्या की, मी क्षमा मागते. मी चूक केली. बाललैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला मी क्षमा केली होती. या वृत्ताने अनेकांना दु:ख झाले आहे. मी नेहमीच मुलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेच्या बाजूने होते अन् राहीन.

एप्रिल २०२३ मध्ये हंगेरीतील एका बालगृहाच्या माजी उपसंचालकांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात क्षमा करण्यात आली होती. त्याने त्याच्या वरिष्ठाला मुलांवरील लैंगिक शोषणाची प्रकरणे दाबण्यासाठी साहाय्य केले होते. राष्ट्राध्यक्षांनी क्षमा केल्यानंतर त्यांना विरोध चालू झाला होता. हा विरोध ९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी वाढला. अनेक नागरिक राष्ट्राध्यक्ष नोव्हाक यांच्या घराबाहेर आंदोलने करत होते आणि त्यांच्या त्यागपत्राची मागणी करत होते.

संपादकीय भूमिका

  • जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतात अशी संवेदनशीलता किती लोकप्रतिनिधी दाखवतात ?