ग्रेटर नोयडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोयडा येथे माज पठाण याने वैभव अग्रवाल यांची हत्या करून त्यांचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. एका मुलीच्या छायाचित्रावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. माज पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
१. ग्रेटर नोएडातील दनकौर भागातील बिलासपूर येथे रहाणारे वैभव अग्रवाल २९ जानेवारी २०२४ पासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला; मात्र ते न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती.
२. या प्रकरणी पोलिसांनी तंत्रज्ञानाचे साहाय्य घेत भ्रमणभाषच्या आधारे वैभव यांची माहिती मिळवली.
३. वैभव यांची हत्या करणारा माज पठाण हा त्यांना आधीपासूनच ओळखत होता. माज पठाण याने वैभव यांना एके ठिकाणी भेटायला बोलावले आणि तेथे त्याने एका मित्राच्या साहाय्याने वैभव यांचा खून केला. यानंतर दोघांनी मिळून मृतदेह कालव्यात फेकून दिला.
Vaibhav Agrawal murdered by Maaj Pathan in #GreaterNoida (Uttar Pradesh); Body thrown in a canal.
It is reported that there was an argument between the two over a photograph of a girl.
Maaj Pathan has been arrested by the police.#CrimeNews
Video Courtesy : @_treeni pic.twitter.com/GCkJOMpWxY— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2024
पठाण याच्याकडून पोलिसांवर गोळीबारपठाण नोएडातील धनौरी ते सक्का या भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना दुचाकीवरून जात असतांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. (पोलिसांवर गोळीबार करण्याइतपत उद्दाम झालेले मुसलमान ! – संपादक) पोलिसांनी प्रत्युत्तर देत चकमकीत दोघांनाही घायाळ करून अटक केली. |