आर्थिक दिवाळखोर इजिप्त त्याचे शहर संयुक्त अरब अमिरातला विकणार !

कैरो (इजिप्त) – आर्थिक दिवाळखोर होण्याच्या स्थितीत असणार्‍या इजिप्त या इस्लामी देशाने त्याचे ‘रास अल् हिकमा’ हे शहर संयुक्त अरब अमिरातला विकण्याचा निर्णय घेतला आहे. इजिप्तला या शहराच्या बदल्यात २२ अब्ज डॉलर्स मिळणार आहेत. हे शहर सुंदर असून तेथील समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला इजिप्तचे नागरिक ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे म्हणतात. राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी शहर विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशात विरोध केला जात आहे.

इजिप्तला परकीय चलनाची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळेच रास अल् हिकमा हे शहर संयुक्त अरब अमिरातीच्या कह्यात देण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातमधील गुंतवणूकदार वित्तपुरवठा करून या शहराचा विकास करतील आणि व्यवस्थापनही सांभाळतील, असे इजिप्तच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

संपादकीय भूमिका 

लवकरच पाकिस्तानचीही हीच स्थिती होणार असून पाकचे तुकडेच होणार आहेत !