योगी आदित्यनाथ आणि भाजपचे इतर नेते यांची १७ वर्षांपूर्वी प्रतिमा मलीन केल्याचे प्रकरण !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप अनेक नेत्यांची बनावट (ध्वनीचित्र चकतीच्या) सीडीच्या माध्यमातून प्रतिमा मलीन केल्याच्या प्रकरणी गोरखपूर न्यायालयाने आरोपी परवेझ परवाझ याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
वर्ष २००७ मध्ये इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशी देण्यात आली, तेव्हा परवेझ याने गोरखपूर येथे प्रक्षोभक भाषणे दिली होती आणि मुसलमान जमावाकरवी शहरातील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक केली होती. यानंतर त्याने गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ आणि भाजपचे नेते शिवप्रताप शुक्ला, राधामोहन दास अग्रवाल आणि अंजू चौधरी यांच्यावर प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप करत खोटी तक्रार नोंदवली होती. न्यायालयाने परवेझ याला पुरावे सादर करण्यास सांगितल्यावर त्याने सीडी न्यायालयाकडे सुपुर्द केली. या सीडीमध्ये या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे असल्याचा दावा त्याने केला. ही सीडी गुन्हे वैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. न्यायाधीश आदर्श श्रीवास्तव यांनी त्याला शिक्षा सुनावली. परवेझ हा यापूर्वीच एका बलात्कार प्रकरणात कारागृहात आहे.
संपादकीय भूमिका
|