सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती

‘मला एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये मंत्रपठणासाठी जाण्याची संधी त्यांच्याच कृपेने लाभली. या वेळी परात्पर गुरुदेवांच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांच्याकडे पाहून प्रयोग करतांना मला आलेल्या अनुभूती मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रयोग १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरावर असलेली सूर्यप्रतिमा आणि गरुडाची मूर्ती यांकडे ३ – ४ वेळा थोडा थोडा वेळ पहाणे

श्री. अरुण कुलकर्णी

अनुभूती : मी काही वेळ सूर्यप्रतिमेकडे पाहिले आणि नंतर गरुडाच्या मूर्तीकडे थोडा वेळ पाहिले. तेव्हा ‘गरुडाच्या मूर्तीकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

प्रयोग २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये असलेल्या देवघरातील श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या चित्रांकडे चष्मा काढून अन् नंतर चष्मा लावून ३ – ४ वेळा थोडा थोडा वेळ पहाणे

अनुभूती : चष्मा न लावता श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या चित्रांकडे पाहिल्यावर मला ती चित्रे नीट दिसत नव्हती; मात्र तरीही मला त्यात श्रीराम आणि श्री हनुमान यांचे दर्शन झाले. ‘मी चष्मा लावलेला नाही’, असे क्षणभर मला वाटलेच नाही. ‘चष्मा न लावताही देवतांचे दर्शन होऊ शकते’, हे मला या प्रयोगातून अनुभवता आले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या अनुभूती अनुभवता आल्या’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अरुण कुलकर्णी, बांदोडा, फोंडा, गोवा. (१५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक