सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) मालती शहा (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. (श्रीमती) मालती शहा आजी

पुणे –  पुणे येथील सनातन संस्थेच्या १२० व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) मालती शहा आजी (वय ८६ वर्षे) यांनी ६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी रात्री ८.३० वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केले होते. पू. (श्रीमती) शहाआजी या प्रेमळ आणि आनंदी स्वभावाच्या होत्या. सहनशीलता आणि स्थिरता या गुणांच्या आधारे त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहिल्या.

सनातन संस्थेचे पुणे येथील साधक श्री. शिरीष शहा (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या त्या आई होत्या. पू. आजींच्या पश्चात २ मुले, २ सुना, ३ नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. ७ फेब्रुवारीला दुपारी नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सनातनचे साधकही उपस्थित होते.