कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी हिंदु मंदिरात जाऊन नवस फेडला !
मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी श्रीक्षेत्र पणोलिबैल येथील कल्लूर्टी कल्कुड देवाचा पूजेत सहभागी होऊन नवस फेडला. यू.टी. खादर यांच्या या कृतीवर मुसलमान धार्मिक नेते सालेत्तुरू फैझी यांनी आक्षेप घेऊन सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट प्रसारित केली आहे. यात त्यांनी ‘खादर यांनी देवतांची पूजा करूदे. प्रसाद घेऊन कपाळाला टिळा लावून नरकात जाऊदे. ते त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. ते भारतात सर्वांना असलेले घटनात्मक स्वातंत्र्य आहे. ते रोखण्याचा अधिकार मला नाही’, असे म्हटले आहे.
Speaker of Karnataka state Legislative Assembly, U.T. Khader visited Hindu temple and took vows.
May Khader go to hell. – Agitated Mu$l!m religious leader.
👉 The brazen opinion of religious leader towards the presiding authority of State Assembly, belonging to the same faith,… pic.twitter.com/FdJDi2iLHF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 6, 2024
या पोस्टमध्ये फैझी यांनी पुढे लिहिले आहे, ‘यू.टी. खादर यांना मुसलमानांनी केवळ राजकारणी म्हणून पहावे. धार्मिक प्रमुख म्हणून पाहू नये. धार्मिक मुसलमान नेते असणार्या कार्यक्रमात त्यांना ‘मुसलमानांचा नायक’ म्हणून बसवणे योग्य नाही. त्यामुळे त्याच्या भुताराधनेला आपण स्वीकृती दिल्यासारखे होईल. मुसलमान समाजाला चुकीचा संदेश दिल्यासारखे होईल.’
संपादकीय भूमिकाधार्मिक नेत्यांच्या तोंडी स्वधर्मातील उच्च पदावरील व्यक्तीविषयी कसे शब्द आहेत, यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते ! असे धार्मिक नेते कधीतरी मुसलमानांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता शिकवतील का ? उलट हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच चिथावणी देतील, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! |