नवी मुंबई : अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या वतीने २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघर येथे ४८ वा अश्वमेध महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या महायज्ञाची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. या महायज्ञातील हवन कुंडाच्या प्रकटीकरणासाठी पहिल्या ५ कुंडांची वैदिक पद्धतीनुसार विशेष पूजा ४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
यज्ञशाळेत १ सहस्र ८ तलाव असणार आहेत. प्रत्येक यज्ञकुंडात १० भाविक बसतील. १० सहस्र भाविकांना एकाच वेळी यज्ञ करता येणार असून तितक्याच संख्येने भाविकांना परिक्रमा करता येणार आहे. तसेच सहस्रो भाविक प्रतीक्षागृहात बसणार आहेत. ४०० निवासी तंबू बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. संध्याकाळी ५० सहस्र भाविकांना एकत्र महाप्रसादाची व्यवस्था असणार आहे.
(सौजन्य : Shantikunjvideo Gayatri Pariwar)
मुंबई अश्वमेध महायज्ञ समितीचे प्रभारी श्री. शरद पारधी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायज्ञाच्या सिद्धतेविषयी चर्चा केली.