मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी २४ घंटे २ शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती !

जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे लढा देत आहेत. त्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार २ फेब्रुवारीपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी २४ घंटे २ शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली.