शहापूर (ठाणे) येथील विद्यार्थ्यांना विषबाधा

ठाणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) – शहापूर तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. जेवण झाल्यावर विद्यार्थ्यांना उलटी होणे, मळमळणे, तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ लागले, तर काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले. शिक्षकांनी १०९ विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यामध्ये ४६ मुले असून ६३ मुली आहेत. सद्य:स्थितीत सर्वांची प्रकृती ठीक आहे. (शाळेत मिळणार्‍या शिध्याच्या दर्जाविषयी अनेकदा तक्रारी आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत दर्जेदार आहारच मिळेल, यासाठी शासन काही अधिक ठोस उपाय योजणार का ? – संपादक)