‘२७ जानेवारी २०२४ या दिवशी वझरांत, वागातोर (गोवा) येथील समुद्रकिनारा नियंत्रण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अवैधपणे उभारण्यात आलेल्या ‘रोमिओ लेन’ या उपाहारगृहाचा बराच भाग प्रशासनाकडून पाडण्यात आला होता. २८ जानेवारीला पुन्हा याच उपाहारगृहाच्या अवैध शॅकवर (‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्यावरील उपाहारगृह आणि मद्यविक्री केंद्र) कारवाई करण्यात आली. शॅकवर कारवाई केल्याने गोव्यातील अन्य किनारी भागात अवैध बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.’