महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांची मागणी
पनवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी पत्र पाठवून ‘सत्यशोधक’ या नुकत्याच प्रदर्शित चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
या पत्रात अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे, ‘‘पाकिस्तानमधून साहाय्य मिळालेला ‘सत्यशोधक’ हा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जातीय वाद निर्माण करणारा आणि हिंदु धर्माला जिवंत ठेवणार्या ब्राह्मण वर्गाला खलनायक ठरवणारा आहे. त्यामुळे या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी.’’
अजय सिंह सेंगर यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘ब्राह्मण हा हिंदु धर्माचा मुकुटमणी आहे आणि ब्राह्मण होते म्हणून हिंदु धर्म वाचला आहे. ब्राह्मणांविरोधात काल्पनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्याला ऐतिहासिक आधार नाही. हिंदु धर्मात फूट पाडण्यासाठीच या चित्रपटात अशी कथा घालण्यात आली आहे. हिंदु धर्म किती निकृष्ट आहे, हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी.’’