मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथील धर्मांधांच्या दंगलीनंतर ‘बुलडोझर पॅटर्न’ !

(उत्तरप्रदेश येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगल करणार्‍या धर्मांधांची घरे बुलडोझरने पाडल्याने देशभर ‘बुलडोझर पॅटर्न(पद्धत)’ लोकप्रिय झाला.)

ठाणे – मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथील धर्मांधांच्या दंगलीनंतर मीरा-भाईंदर पालिकेने नयानगर या मुसलमानबहुल भागातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या २५ अनधिकृत दुकानांच्या टपर्‍या बुलडोझर वापरून तोडून टाकल्या. या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

संपादकीय भूमिका

  • शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे; परंतु अनधिकृत बांधकामे इतके दिवस का पोसण्यात आली ? हेही समोर आले पाहिजे !
  • व्हिडिओमध्ये दंगल करणारे धर्मांध हे या अनधिकृत दुकानांचे मालक असतील, तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे हिंदूंना वाटते.