प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले असतांना आला हृदयविकाराचा झटका !
चंडीगड (हरियाणा) – राज्यातील भिवानी येथे रामलीलेचा कार्यक्रम चालू असतांना ‘हनुमाना’ची भूमिका निभावणार्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रामलीला चालू असतांनाच हरिश मेहता नावाचे कलाकार अचानक भूमीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रामलला की प्राण प्रतिष्ठा के अवसर में भिवानी में आयोजित कार्यक्रम में न्यू बासुकीनाथ रामलीला कमिटी के हरीश कुमार की सोमवार को हनुमान का किरदार निभाते समय अचानक हार्टअटैक से मौत हो गई। उन्हें तुरंत प्राइवेट अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया।… pic.twitter.com/KWpcuFZ8K2
— NBT Hindi News (@NavbharatTimes) January 22, 2024
रामलीलेत हनुमानाच्या रूपातील मेहता श्रीरामाच्या चरणांवर डोके ठेवल्याचा प्रसंग होता. त्या वेळी श्रीराम आणि श्री हनुमान यांचा जयजयकार चालू झाला; परंतु काही सेकंद होऊन गेल्यानंतरही मेहता उठले नाहीत. हे कळताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. काही काळापूर्वीच वीज विभागातून निवृत्त झालेले मेहता गेली २५ वर्षे रामलीलेच्या कार्यक्रमात हनुमानाची भूमिका साकारत आले होते.