सांगली – अयोध्येतील श्रीराममंदिरात होत असलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियान राबवण्यात आले. यात श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच उपस्थितांना श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. हे अभियान सांगली, विश्रामबाग, मिरज, ईश्वरपूर, पलूस यांसह जिल्ह्यातील विविध मंदिरे, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, सनातन संस्थेचे हितचिंतक, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार यांच्या घरी राबवण्यात आले.
नामजप केल्यावर अनेक भाविकांनी ‘आनंद मिळाला’, ‘प्रत्यक्ष प्रभु श्रीराम अवतरले आहेत’, असे जाणवले’, यांसह अन्य अनुभूती आल्याचे सांगितले. ईश्वरपूर येथील नृसिंह मंदिर येथे झालेल्या नामसंकीर्तन अभियानप्रसंगी सनातनचे पू. राजाराम नरुटे (आबा) यांची वंदनीय उपस्थिती होती.
सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि रामरक्षास्तोत्र ग्रंथाचे वितरण !
‘श्रीरामरक्षास्तोत्र’ लघुग्रंथ वितरण
मिरज – प्रभु श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ होण्यासाठी श्रीरामाची माहिती देणारा श्रीराम लघुग्रंथ, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि श्रीरामरक्षास्तोत्र या ग्रंथांचे वितरण करण्यात येत आहे. यात भाजपचे सांगली शहर जिल्हामहामंत्री श्री. मोहन वाटवे, व्यावसायिक श्री. राजेंद्र जोशी आणि ‘स्वामी समर्थ इडली वडा व डोसा सेंटर’चे चालक श्री. नितीन कुलकर्णी, धर्मप्रेमी श्री. दिगंबर कोरे यांसह अन्य श्रीरामभक्तांचा सहभाग आहे. करतांना श्री. राजेंद्र जोशी (उजवीकडे)