माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने २२ जानेवारीला कारसेवकांचा सत्कार !

मिरज – माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने काशी विश्वेश्वर मंदिराच्या पटांगणात (भानू तालिमेसमोर) २२ जानेवारीला सकाळी १० वाजता कारसेवकांचा सत्कार होणार आहे. या प्रसंगी १ माळ ‘श्रीराम जय राम जय जय राम’, भीमरूपी स्तोत्राचे १ वेळा पठण, तर ११ वेळ श्रीरामरक्षा पठण करून घेतले जाणार आहे. येथेच भव्य पडद्यावर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यानंतर आरती आणि सर्वांना प्रसाद वाटप होणार आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन माधवराव गाडगीळ मित्र परिवार, विघ्नराज सार्वजनिक मंडळ यांनी केले आहे.