‘जात, पात छोडो, हिंदु राष्ट्र को जोडो’चा विचार घेऊन सर्व रामभक्तांचा सहभाग !
पिंपरी (पुणे) – २० जानेवारीला पिंपरी येथे काढलेल्या शोभायात्रेत सहभाग घेतला. रामभक्त धनराज बिर्दा यांनी आयोजित केलेली शोभायात्रा शगुन चौकातून नव महाराष्ट्र विद्यालयापर्यंत काढण्यात आली. अनेक ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून रामरथावर पुष्पवृष्टी करत रामभक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. यानंतर नव महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आणि ‘१०८ राम रसायन होम विधी’ आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ रामभक्त हेमंत हरारे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा आणि वारकरी वेषात बालके टाळ, मृदुंगाचा गजर करत श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच महिलांनी मंगल कलश यात्रा काढून वातावरण भक्तीमय केले. तरुण मुलींनी फुगड्या खेळत, दांडिया खेळून आनंद लुटला. राजस्थानी भगिनींनी केलेले ‘गेर नृत्य’ लक्ष वेधून घेत होते. होम हवनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.