२२ जानेवारीला श्रीराम उत्सव असल्याने मांस आणि मद्य विक्रीला गावात बंदी !

ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे २२ जानेवारीला होणारा श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा उत्सव संपूर्ण देशभर घरोघरी मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. धार्मिक कार्य असल्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व प्रकारची मटण, चिकन, मासे, तसेच देशी अन विदेशी मद्य (दारू) यांची विक्री एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी पत्राद्वारे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

शहरात मांस आणि मद्य विक्रीला बंदी घालण्याची शिवसेनेची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे मागणी

ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील खारबाव गावामध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत गावात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मासे, तसेच देशी किंवा विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यासाठी खारबाव ग्रामपंचायतीने बंदी केली आहे. सर्व विक्रेते आणि दुकानधारक यांनी या सूचनेची नोंद घेऊन श्रीराम उत्सव करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.